मुंबईत सहा जणांची क्रूर हत्या

November 11, 2008 2:26 PM0 commentsViews: 3

11 नोव्हेंबर, मुंबईमुंबईत 6 जणांची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. नालासोपार्‍यात एकाच घरात 4 जणांचा गळा कापून खून तर ओशिवर्‍याताही दोन मृतदेह सापडले आहेत.ठाणे जिल्ह्यातल्या नालासोपारामध्ये एकाच घरातल्या चौघांची गळा कापून हत्या झाल्याचं उघड झालंय. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींचा समावेश आहे. या हत्या घरगुती वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुंबईतल्या ओशिवरामध्ये दोघा जणांची हत्या करण्यात आली आहे. ओशिवरातल्या म्हाडा कॉलनीत ही घटना घडली. प्रकाश निर्मल आणि संदीप निर्मल अशी मृतांची नावं आहेत. चार लोकांवर हल्ला झाला होता. त्यापैकी दोघेजण जखमी झालेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरोड्यासाठी हा हल्ला झाल्याचा संशय आहे.

close