टोलनाका बंद होण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आंदोलन

May 31, 2011 1:41 PM0 commentsViews: 5

31 मे

पुणे-सातारा रोडवर खेड- शिवापूर टोलनाका बंद व्हावा यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेनं आंदोलन पुकारलं होतं. मात्र याधीच राष्ट्रवादी काँग्रेसनं इथं आंदोलन करत त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर तिथे शिवसेना, मनसे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावरच्या काही कुंड्यांची नासधुसही केली. या आंदोलनामुळे हायवेवरच्या दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

close