गिरगाव चौपाटीवर शहीद ओंबाळे यांचे स्मारक

May 31, 2011 2:08 PM0 commentsViews: 4

31 मे

26/11च्या मुंबई दहशतवादी हल्यामध्ये शहीद झालेले तुकाराम ओंबाळे यांचं स्मारक उभारण्याच्या कामाला स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे. गिरगाव चौपाटीजवळ ओंबाळेचा हा अर्धकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.

हल्ला करणार्‍या अतिरेक्यांपैकी एकमेव जिवंत सापडलेला अतिरेकी अजमल कसाब याला पकडून देण्यात ओंबाळेचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यामुळे त्यांचं स्मारक उभारण्याची मागणी होत होती.

पण 26/11च्या हल्ल्याला दोन वर्ष होऊन गेलं तरी स्मारकाला मंजुरी मिळत नव्हती. महापालिका विरोधी बाकांवर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीनं याबद्दल सत्ताधार्‍यांवर टीका केली होती. अखेर आज या कामाला स्थायी समितीनं हिरवा झेंडा दाखवला.

close