कास तलावाच्या परिसराची खा.उदयनराजे भोसलेंनी केली साफसफाई

May 31, 2011 2:25 PM0 commentsViews: 77

31 मे

सातार्‍यातल्या कास तलाव परिसरात वाढलेल्या पर्यटनाचा फटका या भागाला बसतो आहे. या ठिकाणी येणारे पर्यटक कचरा इथंच टाकून जातात त्यामुळे इथं घाणीचं साम्राज्य पसरले आहे. याचाच निषेध करत खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वत: या ठिकाणाची स्वच्छता केली.

कास तलावात बोटिंग सुरू करण्याच्या प्रस्तावालाही आपला विरोध असल्याचे उदयनराजे यांनी सांगितलं. महाबळेश्वरपासून या भागाला जोडल्या जाणार्‍या रस्त्याला उदयनराजे यांनी विरोध केला. कास परिसरात मोठ्या लोकांनी जमिनी खरेदी केल्या असल्यातरी त्यांना कासच्या पाण्याचा एक थेंबही देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

close