रायगडावर वाघ्याला पोलिसांचा पहारा

May 31, 2011 2:39 PM0 commentsViews: 3

31 मे

रायगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी अनेक दशकं विराजमान असलेल्या वाघ्या कुत्र्याचं स्मारक वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. हा पुतळा पुण्यातल्या शिवाजी स्मारक समितीनं बसवला होता.

मात्र संभाजी ब्रिगेडनं पुतळा हटवण्याचा इशारा दिला आहे. 6 जून पर्यंत वाग्याचा पुतळा हटवला नाही तर आम्ही उध्दवस्त करू असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.

संभाजी ब्रिगेडच्या इशार्‍यानंतर रायगडावर वाघ्याच्या पुतळ्याभोवती पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला. गेल्या दहा दिवसांपासून पुतळा पोलिसांच्या संरक्षणात आहे. दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या या आडमुठेपणामुळे रायगडमध्ये येणार्‍या पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

close