म्हाडाची लॉटरी पुढच्या वर्षी 2300 घरांची !

May 31, 2011 3:54 PM0 commentsViews: 1

31 मे

यावर्षीची म्हाडाच्या लॉटरीची सोडत संपल्यानंतर म्हाडाने पुढच्या वर्षीच्या लॉटरीची घोषणा केली. यात पवई तुंगा इथं सर्वाधिक 2300 घरं उपलब्ध होणार आहेत. त्यात अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटांसाठी ही घरं असतील असं म्हाडाकडून सांगण्यात आलं आहे.

यावर्षी म्हाडानं मुंबईत सर्वसामान्य नागरीकांना स्वस्त दरात, 4034 घरं विक्रीसाठी उपलब्ध केली होती. या घरांसाठी म्हाडानं ऑनलाईन अर्ज मागवले होते. म्हाडाकडे एक लाख तीस हजार दोनशे तेहत्तीस अर्ज डिपॉझीटसह जमा झाले. यापैकी चार हजार 34 भाग्यवंताना घर वाटण्यात आली.यासाठी म्हाडाने प्रतिक्षानगर,मालवणी,मागठाणे,कुर्ला, पवई, सिंपोली,मानखुर्द आणि शैलेंद्रनगर या भागाचा समावेश केला आहे.

close