मनसेनं आपल्या झेंड्यातून निळा रंग काढून टाकावा – आठवले

May 31, 2011 4:19 PM0 commentsViews: 3

31 मे

दादर स्टेशनच्या नामांतरावरून सध्या जोरदार वाद सुरु आहेत. शिवशक्ती भीमशक्तीमध्ये फूट पाडण्यासाठीच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं दादर स्टेशनचं नामांतर चैत्यभूमी करावे अशी मागणी केल्याचा आरोप आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केला आहे.

दादर स्टेशनचं नामांतर चैत्यभूमी असं न करता त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं असं ही आठवले म्हणाले आहे. नामांतराला विरोध केल्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही त्यांनी फटकारलंय. राज ठाकरेंना बाबासाहेबांबद्दल प्रेम नसेल तर त्यांनी मनसेच्या झेंड्यातून निळा रंग काढून टाकावा असं आठवले यांनी म्हटलं आहे.

close