साध्वीच्या नार्को टेस्टवर बाबा रामदेव यांचा आक्षेप

November 11, 2008 2:36 PM0 commentsViews: 3

11 नोव्हेंबर, मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंगला बाबा रामदेव यांनी सहानुभूती व्यक्त केली आहे. बॉम्बस्फोटाचा तपास करणार्‍या एटीएस पथकानं केलेल्या नार्को टेस्टवरही उपस्थित केले आहेत.मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ही निर्दोष असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलंय. ' नार्को अ‍ॅनॅलिसिस चार -चार वेळा करण्याची गरजच काय ? यामुळे नार्को टेस्टवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.एकाच टेस्टमध्ये हे का सिद्ध झालं नाही. दुसर्‍या अतिरेक्यांची अशी टेस्ट का केली जात नाही ', असं बाबा रामदेव म्हणाले.

close