मनसेला खिंडार पडत असल्यामुळे राज ठाकरे बिथरले – आठवले

June 1, 2011 9:56 AM0 commentsViews: 2

01 जून

मनसेमधील आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते आता शिवशक्ती-भीमशक्तीकडे वळत आहे. त्यामुळेच राज ठाकरे बिथरलेत आणि त्यांनी टीका केली असा प्रतिहल्ला आता आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी केला आहे. आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आठवलेंवर निळा रंग ही खासगी मालमत्ता नसल्याची टीका केली होती. नाशिकमध्ये आज शिवशक्ती – भीमशक्तीचा एकत्र मेळावा होत आहे. या मेळाव्यात आठवले यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

close