स्पेक्ट्रमच्या रडारवर द्रमुकचा आणखी एक नेता ?

May 31, 2011 5:01 PM0 commentsViews: 5

31 मे

2 जी घोटाळ्याप्रकरणी द्रमुकचा आणखी एक नेता आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. करुणानिधींचे भाचे आणि माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन यांनी 2006 साली आपल्या कार्यकाळात काही ठाराविक कंपन्यांना झुकतं माप दिलं होतं अशी बातमी तेहलका या मासिकाने दिली आहे.

मारन यांनी स्पेक्ट्रम वाटपात सिंगापूरमधील मॅक्सिस या कंपनींला झुकतं माप दिलं. आणि बदल्यात स्वतःच्या मालकीच्या सन टीव्हीसाठी कोट्यवधींची लाच मिळवली असा दावा या मासिकाने केला आहे.

मॅक्सिस ही परदेशी कंपनी भारतातील एअरसेल या कंपनीची प्रमोटर आहे. दरम्यान मारन यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळलेत आणि तेहलकाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मारन यांनी याबाबत सोमवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही भेट घेतली.

close