दख्खनची राणी झाली 82 वर्षांची…

June 1, 2011 8:06 AM0 commentsViews: 6

01 जून

डेक्कन क्वीन अर्थात दख्खनच्या राणीचा आज वाढदिवस आहे. डेक्कन क्वीनमधून रोजचा प्रवास करणारे हजारो आहेत. अनेकांनी महत्त्वाचे निर्णय याच गाडीत घेतले. अनेकांच्या आयुष्याचा ही दख्खनची राणी अविभाज्य भाग बनली. त्यांच्या सुखदु:खाची साक्षीदार बनली.

गेली 81 वर्ष डेक्कन क्वीन प्रवाशांची हमसफर आहे. बराचसा वेळ प्रवासात खर्च होत असल्याने रोजच्या प्रवाशांसाठी डेक्कन क्वीन दुसरं घरचं आहे. त्यामुळचं ऑफिस गाठण्याआधी जरासा निवांतपणा त्यांना या ट्रेनमध्ये मिळतो.

डेस्टिनेशनला वेळेवर पोहचवणार्‍या आपल्या राणीचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा केला. ट्रेनच्या मोटरमनशी रोजच्या प्रवाशांची चांगली मैत्री जमली. पण 81 वर्षापूर्वीच्याच गोष्टी अजूनही कायम असल्यानं काही प्रवाशांनी यात सुधारणेची मागणी केली.

close