टीम इंडियाचा गौरव ; सचिनला सर्वोत्कृष्ट पुरस्कार

May 31, 2011 5:09 PM0 commentsViews: 1

31 मे

वर्ल्डकप आणि त्यानंतरच्या आयपीएलमध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी मैदान गाजवलं. मैदानावरच्या त्यांच्या याच कर्तृत्वाचा गौरव आज बीसीसीआयनं केला. मुंबईत झालेल्या शानदार सोहळ्यात वर्ल्ड कप विजेत्या भारतीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला यावेळी 2 कोटी रुपये देण्यात आले आहे. याआधी 2009-2010 या वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

सचिन तेंडुलकरला वर्षातल्या सर्वोत्तम खेळाडूसाठी पॉली उम्रीगर पुरस्काराने गौरवण्यात आलं. याशिवाय देशांतर्गत स्पर्धांमध्ये अव्वल कामगिरी करणार्‍या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. याच सोहळ्यात सलीम दुराणी यांना सी के नायडू जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

close