अथणीत कापड दुकानाला आग 6 जणांचा मृत्यू

June 1, 2011 7:58 AM0 commentsViews: 2

01 जून

बेळगाव येथील अथणीमध्ये एका चार मजली कपड्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पहाटे साडेतीन वाजता एका चार मजली कपड्यांच्या दुकानाला आग लागली. या आगीमध्ये दुकानमालकासह सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडचे आठ बंब बोलावण्यात आले होते.

close