बेळगाव सीमा प्रश्नी पाच जिल्ह्यात जेलभरो आंदोलन

June 1, 2011 8:23 AM0 commentsViews: 7

01 जून

कन्नड सक्तीविरोधी आंदोलनाला आज 25 वर्षे पूर्ण होत आहे. तरीही बेळगाव सीमा प्रश्न सुटलेला नाही. याविरोधात केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाचवेळी जेलभरो आंदोलन केलं.

कोल्हापुरातल्या बिंदु चौकात हे आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्न सुटावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलकांनी काही काळ रस्ता रोकोही केलं.

close