पैशाअभावी बिल्डर्सचे प्रोजेक्टस खोळंबलेत

November 11, 2008 2:52 PM0 commentsViews: 7

11 नोव्हेंबर मुंबई सध्या अनेक क्षेत्रात मंदीचं वातावरण दिसतंय. बांधकाम क्षेत्रही याला अपवाद नाही. या क्षेत्रातील अनेक बिल्डर्सनाही याचा चांगलाच फटका बसतोय. पुरेशा पैशाअभावी अनेक बिल्डर्सचे प्रोजेक्टस खोळंबले आहेत. होमलोनच्या वाढत्या व्याजदरांमुळे ग्राहकही सध्या वेट अ‍ॅण्ड वॉचच्या मूडमध्ये दिसत आहेत. फ्लॅट्स खरेदीसाठी ग्राहकच कमी झाल्यामुळे बिल्डर्सचं नुकसान वाढलं. गेल्या दोन वर्षांत जागांचे भाव चार ते पाच टक्क्यांनी वाढले आहेत. दक्षिण मुंबईत जागांचे भाव बारा हजार ते पंचवीस हजार रुपये प्रति स्वेअर फूट आहेत. तर पश्चिम उपनगरात दोन हजार ते सोळा हजार रुपये प्रति स्वेअर फूट आहेत. पूर्व उपनगरात हाच दर पाच हजार ते चौदा हजार रुपये प्रति स्वेअर फूट आहे. जागाचे हे दर सर्व सामान्य ग्राहकांना परवडणारे नाहीत. त्यामुळे आता वन बीएचके फ्लॅट्स बांधण्याकडे बिल्डर्स लॉबीनं पुन्हा आपला मोहरा वळवला आहे. वाढता निर्माण खर्च आणि कमी झालेले ग्राहक अशा परिस्थितीत बिल्डर्सनाही तग धरून राहणं आता कठीण होत आहे.

close