महाराष्ट्राच्या लोकलेखा समितीच्या सदस्यांचे राजीनामे

June 1, 2011 11:52 AM0 commentsViews: 3

01 जून

महाराष्ट्राच्या लोकलेखा समितीच्या सदस्यांचा राजीनामा दिला आहे. सरकारी यंत्रणेकडून प्रतिसाद मिळत नाही म्हणून गेल्या वर्षभरापासून नाराज झालेल्या या सदस्यांनी अखेर राजीनामा दिला आहे. एकूण 25 सदस्यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये 20 सदस्य हे विधानसभेतील आहे तर 5 सदस्य विधानपरिषदेतील आहे.

लोकलेखा समितीत काही पक्षांच्या सदस्य ही आहे. यामध्ये अध्यक्ष भाजपचे गिरीष बापट, काँग्रेसचे कालिदास कोळंबकर, शेकापच्या मिनाक्षी पाटील, राष्ट्रवादीचे नवाब मलिक, भाजपचे गिरीश महाजन, शिवसेना एकनाथ शिंदे, मनसेचे बाळा नांदगावकर तसेच विधानपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश दादा देशमुख, काँग्रेसचे भाई जगताप, विनोद तावडे भाजप, दिपक सावंत शिवसेना आदी सभासदांनी आपला राजीनामा दिला आहे.

close