तेजस्विनीला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

June 1, 2011 3:06 PM0 commentsViews: 5

01 जून

मी सिंधुताई सपकाळ या सिनेमाला नुकतंच 58 व्या राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं. आणि आता या सिनेमाच्या यशात आणखी एका सन्मानाची भर पडली आहे. स्पॅनिश फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमातल्या भूमिकेसाठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

यावेळी सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन आणि निर्माते सचिन आणि बिंदीया खानोलकरही यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित या सिनेमाला आत्तापर्यंत अनेक सन्मान मिळाले आहे. शिवाय चार राष्ट्रीय पुरस्कारही या सिनेमाला जाहीर झाले आहेत.

close