जयमाला शिलेदार आणि सावकार यांना राणे स्मृती जीवनगौरव पुरस्कार

June 1, 2011 3:16 PM0 commentsViews: 10

01 जून

नारायण रावजी राणे पुरस्कृत तातू सिताराम राणे स्मृती जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाट्यकर्मी जयमाला शिलेदार आणि प्रसाद सावकार यांना प्रदान करण्यात आला. 25 हजार रोख रूपये, शाल श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. संगीत नाटकातली ही दोनही महत्वाची नावं आहेत.

जयमाला शिलेदारांनी रूक्मिणी स्वयंवर, संगीत मानापमान सारखी अनेक संगीत नाटकं गाजली. याबरोबरच त्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षही होत्या. तर प्रसाद सावकार यांनी विद्याधर परांजपे ही नाटक कंपनी उभारली. सध्या त्यांचं अवघा रंग एकची झाला हे नाटक चांगलं गाजत आहे. वयाच्या 80 व्या वर्षी असलेला या दोघांचा हा उत्साह कुणालाही लाजवेल असाच आहे.

close