पावसाळ्यात पुण्याचे नाले रोबो साफ करणार

June 1, 2011 4:49 PM0 commentsViews: 4

01 जून

नाल्यांच्या आसपास झालेली बांधकामं, अतिक्रमणं आणि नाल्यांमध्ये साठलेला राडारोडा यामुळे अनेक ठिकाणी नालेसफाई करायला अडचण निर्माण होत आहे. त्यामुळेच आता महापालिकेनी यासाठी रोबो घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. येत्या दोन दिवसामध्ये हा रोबो पुण्यामध्ये दाखल होणार आहे. यानंतर या रोबोच्या सहाय्याने जिथे माणुस किंवा जेसीबी जाऊ शकत नाही अशा ठिकाणांचीही सफाई करण्यात येणार असल्याचा दावा महापालिकेतर्फे करण्यात येतोय. त्याबरोबरच ऐन पावसाळ्यात कुठे नाल्यांमध्ये राडारोडा किंवा गाळ साठला तर तो देखील हा रोबो काढणार आहे.

close