मोबाईलमुळे कॅन्सर होऊ शकतो !

June 1, 2011 5:43 PM0 commentsViews: 6

01 जून

मोबाईल फोन्समुळे कॅन्सर होऊ शकतो असा दावा डब्लूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनं केला आहे. लेड, इंजिनाचा धूर यामुळे जितका धोका असतो तितकाच धोका मोबाईलच्या रेडिएशनमुळे असल्याचे डब्लूएचआनं म्हटलं आहे.

मोबाईल आणि कॅन्सर याविषयी अधिक संशोधन होणं गरजेचं असल्याचं डब्लूएचओ च्या संशोधकांनी म्हटलं आहे. मोबाईलवर बोलताना हँड्सफ्रीचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन डब्लूएचआने केला आहे. मोबाईलच्या सुरुवातीच्या काळात डब्लूएचओने मोबाईलच्या वापराला क्लिन चीट दिली होती. पण आता मात्र त्यांच्याच संशोधकांनी त्याचे धोके सांगितले आहे.

close