बेपत्ता राजकिरण सापडले अमेरिकेतील मनोरुग्णालयात

June 1, 2011 5:54 PM0 commentsViews: 3

01 जून

गेल्या दहा वर्षांपासून बेपत्ता असलेले अभिनेते राजकिरण अखेर सापडले आहे. त्यांचे मित्र आणि अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांना शोधून काढले आहे. अमेरिके तल्या मनोरुग्णांच्या एका हॉस्पिटलमध्ये ते सापडले आहे. या दहा वर्षांपासून ते एकटेच असून त्यांच्या कुटुंबानंही त्यांची साथ सोडल्याचं समजतं.

अमेरिकेच्या दौर्‍यात नुकतंच अभिनेते ऋषी कपूर यांना ते अटलांटामध्ये सापडले. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री दिप्ती नवल यांनी फेसबूकवर एक संदेश दिला होता. राजकिरण न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी चालवताना दिसले होते असं त्यांनी त्यात म्हटलं होतं. कर्ज तसेच अर्थ या सिनेमातल्या भूमिकांमुळे राजकिरण चर्चेत आले होते.

close