परदेशस्थ महाराष्ट्रीय उद्योजकांचा परिसंवाद

November 11, 2008 2:58 PM0 commentsViews: 3

11 नोव्हेंबर,महाराष्ट्रातील उद्योगक्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरनं पुढल्या वर्षी 10 जानेवारीला परदेशस्थ महाराष्ट्रीय उद्योजकांचा परिसंवाद आयोजित केला आहे. बांधकाम,आय.टी, शिक्षण, अर्थ अशा विविध क्षेत्रांमधील दिग्गज उद्योजक या ' ग्लोबल महाराष्ट्र ' परिसंवादात सहभागी होतील. तसंच सुमारे हजार अनिवासी महाराष्ट्रीय उद्योजक हजर राहण्याची शक्यता आहे. यावेळी राज्यातील उद्योगाचा विकास करण्यासाठी देशात तसंच विदेशात कोणत्या संधी उपलब्ध आहेत, यासंबंधी चर्चा होईल. या परिसंवांदात महाराष्ट्र इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट कौन्सिल, आयएमसी आणि अमेरिकेतील बृहमहाराष्ट्र मंडळाचा मुख्य सहभाग असेल.

close