बाबांच्या उपोषणाला अण्णांचा पाठिंबा

June 2, 2011 9:59 AM0 commentsViews: 2

02 जून

बाबा रामदेव हे काही स्वार्थासाठी उपोषण करत नाही तर देशासाठी त्यांनी आंदोलन उभारलं आहे. त्यामुळे त्यांच्या उपोषणाला आपला पाठिंबा असल्याचं अण्णा हजारेंनी स्पष्ट केलं आहे.

आज राळेगणसिद्धीमध्ये अण्णांनी सगळ्याच मुद्यांवर सविस्तर उत्तरं दिली. बाबा रामदेव यांच्या उपोषणासाठी आपण 5 जूननंतरचे आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले असून दिल्लीत जाऊन बाबा रामदेव यांची भेट घेणार असल्याचं अण्णा हजारेंनी यावेळी सांगितलं.

बाबा रामदेव यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री गेल्याने आपल्याला वाईट वाटलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पण केंद्र सरकार बाबा रामदेव यांची फसवणुकही करु शकतं अशी भीतीही अण्णांनी व्यक्त केली.

close