आंदोलकांनी आणला महापालिकेच्या दारात मृतदेह

June 2, 2011 10:26 AM0 commentsViews: 1

02 जून

नाशिकमधील सिडकोच्या कब्रस्तानच्या जागेच्या वादावरून आज पुन्हा आंदोलन करण्यात आलं. कब्रस्तानला जागा न मिळाल्याच्या निषेधार्थ सिडको मस्जिद ट्रस्टने महापालिकेच्या आवारात मृतदेह आणला होता. जोपर्यंत कब्रस्तानच्या जागेबद्दलचं अंतिम पत्र हातात मिळत नाही तोपर्यंत मृतदेह महापालिकेच्या आवारातून हलवणार नसल्याचा इशाराही ट्रस्टने दिला होता.

आता महापालिकेने याबद्दल शनिवारी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे महापालिकेच्या आवारातून मृतदेह हलवण्यात आला. कब्रस्तानच्या जागेचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे.

खरं तर भुजबळ फार्मजवळ कब्रस्तानासाठी राखीव जागा होती. 5 मार्चला नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर बैठक ही झाली होती. पण सिडको आणि महापालिका प्रशासन यांच्या वादात ही जमीन अजूनही कब्रस्तान ट्रस्टला मिळालेली नाही.

close