सरीवर सरी…

June 2, 2011 2:08 PM0 commentsViews: 4

02 जून

गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा दिला आहे. राज्यात ठिकठिकाणी आज मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतही पावसाच्या सरी कोसळल्या. कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर परिसरातही पावसाने हजेरी लावली आहे. उकाड्याने हैराण झालेले मुंबईकरांचा नेमका कार्यालयावरून घरी जाण्याचा वेळ आणि पावसाची हजेरी यामुळे चाकरमान्याची धावपळ तर झाली पण थंडगार दिलासा ही मिळाला. काही भागात बच्चेकंपनीसह वृध्दांनी ही पावसात चिंब भिजण्याचा मनमुराद आनंद घेतला. मान्सून पूर्व पाऊस असल्याचा हवामान खात्याने दावा केला आहे.

close