राज ठाकरे विरोधात रिपाईच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

June 2, 2011 11:48 AM0 commentsViews: 5

02 जून

नामांतर मुद्यावरून झालेल्या टिका-कारणावरून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज ठाकरे यांनी रामदास आठवले यांच्यावर केलेल्या टिकेबद्दल कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोचाही प्रयत्न केला. त्यामुळे निराला बाजार भागात पोलिसांना या आंदोलनात हस्तक्षेप करावा लागला.

रामदास आठवले जिंदाबाद आणि राज ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा देत झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात सुमारे अर्धा तास वाहतुकीला अडथळा झाला होता. कार्यकर्त्यांच्या या हल्लाबोल आंदोलनामुळे मराठवाड्यात शिवसेना- आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.

close