आमदाराच्या कार्यकर्त्यांनी केली महापौर दालनाची तोडफोड

June 2, 2011 2:25 PM0 commentsViews: 3

02 जून

अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाचे बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी महापौर दालनाची तोडफोड केली. रवी राणा यांनी महापालिका कर्मचार्‍याला जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप करण्यात येतोय.

याप्रकरणात रवी राणा यांच्या समर्थनार्थ त्यांचे कार्यकर्ते थेट महापौर दालनात घुसले. दालनामध्ये घुसून तोडफोड तर केलीच पण महापौरांच्या खुर्चीला काळंही फासलं. रवी राणा यांच्यावर झालेले आरोप हे चुकीचे आहेत असा या कार्यकर्त्यांचा दावा आहे.

close