फीवाढ नियंत्रण कायद्यावर संस्थाचालक नाराज

June 2, 2011 12:19 PM0 commentsViews: 5

02 जून

राज्यातील खाजगी शाळांच्या फीवाढीवर नियंत्रण ठेवणारा कायदा करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरु केली आहे. पण यामध्ये संस्थाचालकांना तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल संस्थाचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच विनाअनुदानित शाळांची फी सरकार नियंत्रित करुच शकत नाही असा दावाही संस्थाचालकांनी केला आहे. नफेखोरी करणार्‍या काही संस्थाचालकांमुळे सर्व संस्थाचालक बदनाम होत असल्याचा आरोपही त्यांनी मुंबईतील बैठकीनंतर केला.

close