एअरलाईन्स क्षेत्राला सर्वतोपरी मदत करू – पंतप्रधान

November 11, 2008 3:56 PM0 commentsViews: 2

11 नोव्हेंबर, दिल्लीएअरलाईन्स इंडस्ट्रीमध्ये कर्मचार्‍यांची नोकरी जाऊ नये, म्हणून सरकारनं एअरलाईन्स क्षेत्राला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलंय. एअरलाईन्स कंपन्या बंद पडल्या तर मोठ्या प्रमाणात बेरोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले, एअरलाईन्स कंपन्या बंद झाल्या असत्या तर ते आम्हाला आवडलं नसतं आणि कर्मचार्‍यांची नोकरी वाचवणं हेदेखील आमचं पहिलं उदिष्ट होतं.

close