बीडीएस अभ्यासक्रमात इंटर्नशिप सुरु

June 2, 2011 5:16 PM0 commentsViews: 3

02 जून

बीडीएस म्हणजेच बॅचलर ऑफ डेंटल डिग्रीला यंदापासून प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बीडीएस च्या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमात यंदापासून एक वर्षाची इंटर्नशिप सुरु केली जाणार आहे.

सेंट्रल डेंटल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. दीबेंदू मझुमदार यांनी गुरुवारी मुंबईत ही माहिती दिली. 2007 पासून ही इंटर्नशिप बंद करण्यात आली होती. पण केंद्रीय आरोग्य खात्याने सुचवलेल्या बदलानुसार जुलै महिन्यापर्यंत याबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. महाराष्ट्रात बीडीएसची 31 कॉलेजेस आहेत. त्यामुळे राज्यातल्या डेंटलच्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा निर्णय आहे.

close