राज्यातील 210 कापूस संकलन केंद्र बंद

November 11, 2008 3:30 PM0 commentsViews: 4

11नोव्हेंबर वर्धा नरेंद्र मतेयंदा सरकारच्यावतीने सीसीआय आणि नाफेड या दोन सरकारी संस्था कापूस खरेदी करत आहेत. पण या संस्थाच्या धोरणांमुळे राज्यातील दोनशे दहा कापूस संकलन केंद्र बंद आहेत. यातल्या 85 केंद्रात तर कापूस खरेदी होण्याची सूतराम शक्यता नसल्यानं कापूस-उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. दसरा- दिवाळीत वेचलेला कापूस शेतक-यांनी घरी आणला आहे. परंतु कापूस-संकलन केंद्रच बंद असल्यामुळे घरात पडलेल्या कापसाच्या विक्रीचा प्रश्न शेतक-यांना भेडसावत आहे. वास्तविक पणन महासंघाकडे मोठी यंत्रणा आहे. मात्र राज्यसरकार नाफेड आणि सीसीआयमार्फतच कापूस खरेदी करत आहे. आधीच कापूस उत्पादन घटलंय त्यात केवळ उच्च दर्जाचा कापूसच खरेदी करायचा असं आडमुठं धोरण या संस्थांचं असल्यामुळे शेतकरी नागवला जातं आहे. अशा कारभारामुळे केंद्र सरकारनं जाहीर केलेला 3000 रुपयांचा हमी भाव शेतक-यांना मिळणार तरी कसा, असा सवाल शेतक-यांकडून केला जातोय.

close