स्पेक्ट्रम प्रकरणी मारन यांनी सर्व आरोप फेटाळले

June 2, 2011 4:01 PM0 commentsViews: 2

02 जून

2 जी घोटाळ्याप्रकरणी वस्त्रोद्योग मंत्री दयानिधी मारन यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळले आहे. आपल्याला बदनाम करण्याचा हा राजकीय कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मारन यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचा सन टीव्ही ग्रुप आणि मॅक्सिस या कंपनीतल्या डीलमुळे मारन अडचणीत आलेत. मॅक्सिस ग्रुपनं सन टीव्हीमध्ये 600 कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप आहे. पण हे सर्व आरोप खोटे असल्याचं मारन यांनी म्हटलं आहे.

close