बाबांना भाजप आणि संघाचा पाठिंबा

June 2, 2011 6:08 PM0 commentsViews: 2

02 जून

बाबा रामदेव यांच्या आंदोलनाला भाजपने पाठिंबा दिला आहे. आणि बाबा रामदेव यांच्यावर टीका करणार्‍या काँग्रेस नेत्यांना फटकारले आहे. भाजपबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेनंही बाबा रामदेव यांना पाठिंबा दिला.

बाबा रामदेव यांच्या आंदोलनात खोडा घालण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सकारात्मक पाऊल उचलावे असा सल्ला भाजपनं सरकारला दिला आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची दोन दिवसांची बैठक उद्यापासून दिल्लीत सुरू होतेय.

त्यात महागाई, भ्रष्टाचार आणि काळा पैसा या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पंतप्रधान हे पद लोकपालाच्या अधिकारक्षेत्रात आणायला भाजपने पाठिंबा दिला आहे. भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचा सरकारचा हेतू संशयास्पद असल्याचा आरोप भाजपने केला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी रामदेव बाबा यांचं आंदोलन गंभीरपणे घ्यावं असं भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

close