औरंगाबादमध्ये शिवसेना – राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला

June 3, 2011 9:19 AM0 commentsViews: 3

03 जून

राज्य भरात पेटलेलं शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष चांगलाच चिघळलं आहे. औरंगाबादमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या कार्यालयावर काल रात्री अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे.

दानवे यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. औरंगाबादच्या अजबनगरमध्ये शिवसेना कार्यालयावर हा हल्ला झाला आहे. हा हल्ला कोणी केला आणि या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे हे स्पष्ट होऊ शकलं नाही.

पण हा हल्ला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप होत आहे. तर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला आहे.

दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा जाळला तर शिवसैनिकांनी अजित पवार यांचा पुतळा जाळला.

close