मनमाडमध्ये तेलमाफियांचा मुजोरपणा सुरूच

June 3, 2011 10:22 AM0 commentsViews: 4

03 जून

यशवंत सोनवणे जळीतकांडानंतर तेलभेसळांच्या नाड्या आवळल्याचा आव सरकारने आणला. 24 तासात तेलभेसळीच्या अड्‌ड्यांवर धाड सत्र सुरू झालं. पण ती कारवाई पुढचे 24 तासच टिकली. आजही मनमाडमध्ये तेलभेसळीचे अड्डे सुरू असल्याची कुजबूज आहे. सरकार मात्र स्वत:चीचच कातडी वाचवतं आहे.

गरीबांसाठी सवलतीच्या दरातलं केरोसीन तेलभेसळांचे अड्डे पोसतं. तीन तेलकंपन्यांचे डेपो असलेलं मनमाडच्या पानेवाडी शिवार यात आघाडीवर आहे. केरोसीनच्या वितरणावर ज्यांनी नियंत्रण ठेवायचे ते सरकारी अधिकारी वेगळंच काहीतरी करणार आहे. त्यातूनच यशवंत सोनवणे जळीतकांड घडलं.

या प्रकरणानंतर 24 तासात तेलभेसळीच्या अड्‌ड्यांवर धाडसत्र सुरू झालं आणि त्याचा रंग त्यापुढचे 24 तासच टिकला. आज मात्र परिस्थिती पुन्हा जैसे थे.

स्थानिक नागरिक देवेंद्र अडसूळे म्हणतात, मनमाड शहरात आज पण तेलभेसळीचे धंदे सुरू आहेत. काल गुरवारीच एका पोलिसाने माजी आमदाराच्या घरासमोर टँकर खाली होताना पाहिला. तेजवानीचा, कुर्डलवाडीचा, खाकेबागमध्ये, माधवनगरमध्ये आजपण धंदा चालू आहे.

या सर्व प्रकारवर सरकार मात्र छापील उत्तर देत आपली कातडी वाचवतं आहे. या बद्दल महसूलमंत्री विचारणा केली असता ते म्हणाले की, प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. याबद्दल अधिक काही बोलणं योग्य नाही. एक सोनवणे गेले, एक पोपट शिंदे गेला, बाकीचे सारे अलबेल आहेत.

close