ठाण्यात विरोधी पक्ष नेते उतरले नाल्यात

June 3, 2011 10:38 AM0 commentsViews: 6

03 जून

ठाणे महापालिका विरोधी पक्ष नेते नजीब मुल्ला यांनी काल गुरुवारी नालेसफाई दौरा केला. नालेसफाई दौर्‍यासाठी त्यांनी बोट नाल्यात उतरवलीच पण थोड्या वेळाने ते स्वत:सुध्दा नाल्यामध्ये उतरले. नालेसफाई वेळेत होत नसल्याचा त्यांनी निषेध केला.

महानगरपालिकेने 3 कोटींचा निधी यावर्षी नालेसफाईसाठी दिला होता. या निधीतून 135 लहान मोठ्या नाल्यांची सफाई केली जाणार होती. महानगरपालिका 80 ते 90 % नालेसफाई झाल्याचा दावा करत आहे. पण प्रत्यक्षात मात्र दावे फोल असल्याचे दिसतं आहे.

close