अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे पुरस्कार जाहीर

June 3, 2011 11:04 AM0 commentsViews: 10

03 जून

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा 2011 चा चित्रभूषण पुरस्कार सुबल सरकार यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह आणि 50 हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. त्याचबरोबर सहा कलाकार आणि रंगकमीर्ंना चित्रकर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे.

लाईटमन ज्ञानबा चव्हाण, अभिनेत्री माला इनामदार, कला दिग्दर्शक मनोहर आचरेकर, स्टील फोटोग्राफर मोहन लोके, वेशभूशाकार नरेश कांबळे आणि अभिनेता- ग्रंथसंग्राहक नारायण फडके यांना चित्रकर्मी पुरस्कार दिला जाणार आहे. मंगळवारी 21जूनला मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

close