औरंगाबादमध्ये भरलंय हायटेक शेती प्रदर्शन

November 11, 2008 2:39 PM0 commentsViews: 26

11 नोव्हेंबर औरंगाबादशेखलाल शेख औरंगाबादमध्ये हायटेक शेती प्रदर्शन भरलं आहे. या प्रदर्शनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्यानं भरपूर उत्पादन कसं मिळवता येईल याचं मार्गदर्शन केलं जातंय. ग्लोबल वॉर्मिंग आणि शेती, इथेनॉलसारखं पर्यायी इंधन अशी शास्त्रीय माहितीही इथे दिली जातं आहे. शिवाय वायदे बाजारासारख्या मार्केटिंग तंत्रांबद्दलच ज्ञान इथे दिलं जातं. आधुनिक पद्धतीनं तयार करण्यात आलेला ट्रॅक्टर, कमी खर्चात होणारी औषध फवारणी, कमी काळात जास्त उत्पन्न देणारी बियाणी याबद्दलची माहिती एकाच ठिकाणी मिळाल्यामुळे शेतकरी खूश आहेत. वेगवेगळ्या बियाण्यांच्या कंपन्यांचे 125 स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत. त्यामुळे बियाणी, धान्य, भाजीपाला, फुलांचे नमुने या प्रदर्शनात बघायला आणि खरेदी करायला मिळतं आहे. तंत्रज्ञान रोज बदलतंय आणि त्याबरोबर शेतीही. या बदलांची जाणीव शेतक-यांना या प्रदर्शनामुळे होत आहे.

close