राज्यात वरूण राजाचे आगमन

June 3, 2011 12:45 PM0 commentsViews: 1

03 जून

महाराष्ट्रात मान्सूनचं आता आगमन झालंय असं पुणे वेधशाळेनं स्पष्ट केलं आहे. कोल्हापुरात आज पावसाच्या सरी बरसल्या. तर गुरुवारी राज्यभरात पावसाने हजेरी लावली होती. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमान झालं आहे.

कोकण किनारपट्टीवर वेंगूर्ला इथे मान्सून दाखल झाला. दर वर्षीपेक्षा यावर्षी दोन दिवस अगोदरच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. पुढच्या दोन दिवसात मान्सून पूर्ण महाराष्ट्र बरसणार अशी माहिती वेधशाळेचे राष्ट्रीय उपसंचालक ए के मजूमदार यांनी दिली.

close