युपीएच्या मंत्र्यांसाठी वेगळा तुरुंग बांधावा लागेल – गडकरी

June 3, 2011 6:09 PM0 commentsViews: 3

03 जून

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक आजपासून लखनौमध्ये सुरू झाली आहे. त्यात भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीकेची झोड उठवली.

पंतप्रधानांनी पदावर राहण्याचा अधिकार गमावला आहे असं सांगत भाजपने मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याचा ठराव बैठकीत मंजूर केला. तिहार तुरुंगात युपीएच्या मंत्र्यांची वाढती संख्या बघून येणार्‍या काळात मंत्र्यांसाठी वेगळा तुरुंग बांधावा लागेल अशी खोचक टीकाही गडकरी यांनी केली. पण लोकपाल विधेयकाच्या कक्षेत पंतप्रधान आणि वरिष्ठ न्यायाधीश यांना आणण्याच्या मुद्द्यावर भाजपमध्येही एकमत होऊ शकलं नाही.

दरम्यान, लोकपाल विधेयकावर केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पाठवलेल्या पत्राला भाजपनं आज उत्तर दिलं. सरकारने लोकपालाचा मसुदा तयार करताना कोणत्याही पक्षाशी चर्चा केली नसल्याचं भाजपनं म्हटलंय.

सर्व घटकांची मतं ध्यानात घेऊन अंतिम निर्णयासाठी ती संसदेत मांडा अशी सूचना भाजपने केली. लोकपाल विधेयकावर मतं पाठवण्याची सूचना प्रणव मुखर्जी यांनी सर्व राज्य सरकार आणि राजकीय पक्षांना केली होती. पण त्याला उत्तर द्यायला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नकार दिला आहे.

close