ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी – अजित पवार

June 3, 2011 6:15 PM0 commentsViews: 7

03 जून

पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घातलेला राडा हा चुकीचाच होता अशी कबूली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. शिवसेनेवर त्यांनी आज पुन्हा एकदा टीका केली.

शिवसेनेने लिहलेले ठाकरी भाषेतील अग्रलेख वाचून आम्ही किती वेळ शांत बसायचं. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळीही असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. लातूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चैत्यभूमीबद्दल राष्ट्रवादीच्या कुठल्याही मंत्र्याने किंवा पदाधिकार्‍याने वक्तव्य केलेलं नाही. मात्र याची सुरवात शिवसेनेनं केलीय असही ते म्हणाले.

close