वाईट संगतीमुळे संकट येतात – करूणानिधी

June 3, 2011 2:28 PM0 commentsViews: 7

03 जून

द्रमुकचे प्रमुख करूणानिधी यांचा आज 88 वा वाढदिवस आहे. पण या वाढदिवसावर 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा आणि निवडणुकीतल्या वादाचं सावट आहे. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसलाही धमकीवजा इशारा दिला आहे. वाईट संगतीमुळे संकटच ओढावत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी पक्षाचे नेते ए. राजा आणि खुद्द करूणानिधींची मुलगी कनीमोळी सध्या तुरुंगात आहे. 2-जी घोटाळ्याप्रकरणी त्यांना आरोपी करण्यात आलंय. आणि आता याच घोटाळ्यात पक्षातील दुसरे नेते दयानिधी मारन यांच नावही पुढे येतंय.

close