बाबांकडे अकराशे कोटींची संपत्ती !

June 3, 2011 4:37 PM0 commentsViews: 1

03 जून

बाबा रामदेव यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडले आहे. पण बाबा रामदेव यांनी या फाईव्ह स्टार आंदोलनासाठी इतका पैसा कुठून मिळवला हा प्रश्न आहे. रामदेव बाबा यांच्याकडे तब्बल अकराशे कोटींची संपत्ती आहे. सरकारवर टीका करणार्‍या बाबा रामदेव यांना त्याचा तपशील जाहीर करणार काय यांचही उत्तर द्यावं लागेल.

फाईव्हस्टार उपोषणासाठी बाबा रामदेव यांचे जवळचे सहकारी कसा निधी जमवत आहेत ते आयबीएन-नेटवर्कनं दाखवलं. त्यानंतर आपल्या उपोषणात बेकायदेशीर काहीच नाही हे स्पष्ट करण्यासाठी खुद्द बाबा रामदेवच समोर आले. आपलं बुद्धीचातुर्य आणि विनोदबुद्धीचा वापर करत त्यांनी उपोषणामागे राजकीय हेतू नाही असं आपल्या समर्थकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.

पण अशा फाईव्हस्टाईर इव्हेंटसाठी पैसा तर लागतोच. एलसीडी स्क्रीन, कूलर्स, मोबाईल टॉयलेट्स या सोयींसाठी खर्च तर करावा लागतोच. बाबा रामदेव नेहमी चार्टर्ड विमानाने प्रवास करतात. दिल्लीच्या या दौर्‍यासाठीही ते इंदूरहून खासगी विमानाने आले.

अनेक राज्यात बाबा रामदेव यांनी फूड पार्क उभारलेत त्यासाठी पैसा कुठून आला ? बाबांकडे अकराशे कोटींची मालमत्ता आहे. ते आपल्या मालमत्तेचा सर्व तपशील जाहीर करणार आहेत का?

सरकारशी दोन हात करण्यासाठी बाबा रामदेव यांनी मोठा प्लॅटफॉर्म तयार केला. स्वतः अनेक कोटींची माया जमवणारे बाबा रामदेव काळ्या पैशाच्या विरोधात आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करतात. बाबांचा हा दुटप्पीपणा आहे का हा प्रश्न त्यांचे टीकाकार विचारत आहे.

बाबांची 'फाईव्हस्टार' राहणी

- नेहमी चार्टर्ड विमानाने प्रवास – दिल्लीच्या दौर्‍यासाठी इंदूरहून खासगी विमानाने आले- अनेक राज्यांत बाबा रामदेव यांचे फूड पार्क्स – बाबा रामदेव आपल्या मालमत्तेचा सर्व तपशील जाहीर करणार का?

close