उपोषणात जातीयवादींच्या सहभागामुळे अण्णांनी जाण्याचा निर्णय घ्यावा – पाटकर

June 4, 2011 9:41 AM0 commentsViews: 2

04 जून

बाबा रामदेव यांच्या उपोषणात जातीयवादी व्यक्तींचा सहभाग असल्याने या आंदोलनाला आपला पाठिंबा नसल्याचे मेधा पाटकर यांनी स्पष्ट केलंय. बाबांनी या आंदोलनाबाबत विचार करावा असं आवाहन सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केलं.

अण्णा हजारे यांनीही बाबांच्या आंदोलनात जाण्याआधी सगळ्या बाजूंनी विचार करून भूमिका स्पष्ट करावी असंही मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर या फाईव्ह स्टार आंदोलनावरही मेधा पाटकर यांनी हल्लाबोल केला आहे.

आंदोलानावर एवढ्या मोठ्याप्रमाणात पैसा का खर्च केला जातोय असा सवाल पाटकर यांनी उपस्थित केला. आरएसएस आणि भाजपने बाबा रामदेव यांचं आंदोलन हायजॅक केल्याची टीकाही त्यांनी केली.

तसेच देशातील सगळ्याच बाबांच्या संपत्तीची चौकशी करण्याची गरजही मेधा पाटकर यांनी व्यक्त केली. बाबा रामदेव यांच्या उपोषणाबद्दल स्वामी अग्निवेश यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. साध्वी ऋतंभरा सारख्या धर्माचं राजकारण करणार्‍या लोकांना या आंदोलनापासून दूर ठेवण्याची गरज असल्याचं स्वामी अग्निवेश यांनी म्हटलं आहे.

close