मालेगाव एटीएसची कारवाई संशयास्पद – भाजप खासदार आदित्यनाथ

November 11, 2008 5:58 PM0 commentsViews: 1

11 नोव्हेंबर, उत्तर प्रदेश मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात उत्तरप्रदेशातील एक राजकीय नेता असल्याचं बोललं जातंय. गोरखपूरचे भाजप खासदार आदित्यनाथ यांच्याभोवती एटीएसची संशयाची सुई फिरत होती. पण त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. मालेगाव स्फोट प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खासदार आदित्यनाथ यांनीच एटीएसच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसंच केंद्रीय गृहखात्यावरही त्यांनी टीका केली. ' मालेगाव स्फोटाप्रकरणी एटीएसची कारवाई खोटी आहे. काँग्रेसच्या इशार्‍यावर हे चाललं आहे. काँग्रस यात माहीर आहे ',असं आदित्यनाथ यांनी सांगितलं. या भाजप खासदारावर 2007 मध्ये पूर्व उत्तर प्रदेशात जातीय दंगलीला कारणीभूत झाल्याचा आरोप आहे.

close