शिवसैनिकांचे अजित पवारांच्या विरोधात निदर्शन

June 3, 2011 5:26 PM0 commentsViews: 1

03 जून

अजित पवारांनी शिवसेनाप्रमखांवर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी आज मुंबईत सेनाभवन चौकात आज निदर्शनं केली. यावेळी अजित पवारांचा पुतळाही जाळण्यात आला. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अजित पवारांनी माफी मागेेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.

close