दहशतवादी इलियस काश्मिरी ठार ?

June 4, 2011 9:59 AM0 commentsViews: 2

04 जून

पाकिस्तानी दहशतवादी इलियस काश्मिरी ठार झाल्याचं वृत्त आहे. इल्यिसचे आयएसआयशी जवळचे संबंध होते. बीबीसीच्या उर्दू वाहिनीनं काश्मिरी ठार झाल्याचं वृत्त दिलं आहे. अमेरिकेनं वझिरीस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये काश्मिरी ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

त्याच्यासोबत आणखी नऊ अतिरेकीही ठार झाल्याचे वृत्त आहे. मात्र याबाबत पाकिस्तान किंवा अमेरिकेडून दुजोरा मिळालेला नाही. हरकत उल इस्लामचा काश्मिरी हा प्रमुख होता. ही दहशतवादी संघटना अल कायदाशी संबधित होती.

यापूर्वीही इलियास ठार झाल्याचं वृत्त आलं होतं. पण त्यानंतर तो जिवंत असल्याचं स्पष्ट झालं होतं. 26/11 च्या हल्ल्यातला मुख्य आरोपी डेव्हिड हेडली यानंही हल्ल्यामध्ये इलियास काश्मिरी असल्याचा उल्लेख केला होता.कराचीतल्या पीएनएस मेहरानवरच्या हल्ल्यासह अनेक महत्त्वाच्या हल्ल्यांमागचा इलियास मास्टरमाईंड होता.

close