सानियाच्या स्वप्नावर ‘पाणी’

June 3, 2011 5:44 PM0 commentsViews: 5

03 जून

फ्रेंच ओपन टेनिसच्या महिला डबल्समध्ये सानिया मिर्झाने फायनलमध्ये पोचून इतिहास घडवेल अशी सर्वांच अपेक्षा होती. पण सरळ सेटमध्ये 6-4 आणि 6-3 अशा पराभवला सामोर जात सानियाच्या स्वप्नावर पाणी भिरलं.

सानियाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. फायनलमध्ये सानिया आणि तिची जोडीदार एलेना वेसनिना यांचा सरळ सेटमध्ये पराभव झाला. आंदि्रया आणि ल्युसी रॅदेका या बिनसिडेड जोडीने 6-4 आणि 6-3 असा विजय मिळवला. पहिल्या गेमपासूनच सानिया आणि वेसनिना यांचा मॅचमध्ये प्रभाव दिसला नाही. पहिल्या सेटमध्ये एकदा आणि दुसर्‍या सेटमध्ये दोनदा त्यांची सर्व्हिस ब्रेक झाली. आणि अखेर दीड तासात सानिया-एलेना जोडीला पराभव स्विकारावा लागला.

close