खा.मंडलिकांच्या काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब

June 4, 2011 10:07 AM0 commentsViews: 2

04 जून

खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या काँग्रेस प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. मंडलिक यांनी आज दिल्लीत जाऊन काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. मंडलिक यांचे कार्यकर्तेही लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

त्यामुळे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करुन मंडलिक एक वर्तुळ पूर्ण करत आहे. आधी काँग्रेसवासी असलेल्या मंडलिकांनी 99मध्ये शरद पवारांच्या बरोबरच काँग्रेस सोडली आणि पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.

कोल्हापूर मतदारसंघ हा त्यांची जणू मक्तेदारीच होता. मात्र नंतर पवारांशी मतभेद वाढले आणि 2009 मध्ये मंडलिकांनी राष्ट्रवादीची साथ सोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि खासदारकीही मिळवली. त्यानंतरही शरद पवारांशी दुरावा कायमच राहिला. अखेर आता कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मंडलिक काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे.

close