बाबांच्या आंदोलनात श्री राम सेनाही उतरली

June 4, 2011 10:45 AM0 commentsViews: 2

04 जून

साध्वी ऋतंभराच्या उपस्थितीमुळे बाबा रामदेव यांचं आंदोलन वादाच्या भोवर्‍यात सापडलं आहे. आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेचाही बाबांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचा आरोप होतोय. आणि आता तर या हिंदुत्त्ववादी संघटनांशी संबंधित श्री राम सेनाही या आंदोलनात उतरली आहे.

श्री राम सेनेचा अध्यक्ष प्रमोद मुतालिकनं बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात केली. कर्नाटकातल्या प्रत्येक जिल्ह्यात श्री राम सेनेचे कार्यकर्ते रामदेवांच्या समर्थनात उपोषणाला बसले आहेत.

श्री राम सेनेचा अध्यक्ष प्रमोद मुतालिक कट्टर हिंदुत्त्ववादी म्हणून ओळखला जातो. मालेगांव बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसने मुतालिक याची चौकशीही केली होती. बंगळुरूमध्ये एका क्लबवर याच श्री राम सेनेच्या कार्यकर्तांनी हल्ला चढवून मुलींना मारहाण केली होती.

या प्रकरणामुळे मुतालिकवर बरीच आगपाखड झाली होती. असा माणूस बाबा रामदेवांच्या आंदोलनात सहभागी होतोय त्यामुळे रामदेवांच्या आंदोलनावर आणखी वाद उठणार अशी चिन्हं दिसत आहे.

close